शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील भुशी धरण यंदा पर्यटनासाठी राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 19:55 IST

 भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते.

लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांनो थांबा यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील भुशी धरण पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे. लोणावळ्यातील भुशी धरण व लोणावळा परिसरातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाटाचा परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर यावर्षी बंद ठेवण्यात येणार आहेत. भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. धरण परिसरात अनेक पर्यटकांचे बुडून मृत्यु होतात. कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. धरण क्षेत्रात पाऊस जास्त होत असल्याने धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढविला जातो व पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडतात. यावर्षी देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुशी धरण व लोणावळा परिसर तसेच पुणे जिल्ह्यातील वरील सर्व धरण क्षेत्रांचा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हंटले आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 188 अन्वये कारवाई केली जाणार आहे. लोणावळा शहराची पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था कोरोनामुळे मागील दोन अडीच महिन्यात पुर्णतः कोलमंडली आहे. आता पावसाळी सिझन देखिल जाणार असल्याने त्याचा विपरित परिणाम येथिल अर्थकारणावर होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdam tourismधरण पर्यटनlonavalaलोणावळा