शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्याची वाटचाल हॉटस्पॉट होण्याकडे? एका दिवसात ३७ पाॅझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 10:32 IST

पुणे, पिंपरी चिंचवड, ग्रामीण मिळून आतापर्यंत १४२ रूग्ण 

पुणे: शहर व जिल्ह्याचीही वाटचाल आता झपाट्याने कोरोना हॉटस्पॉट कडे होऊ लागली आहे. शहर व पिंपरी चिंचवडसह पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता १४२ झाली आहे.पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रूग्णालयासह भारती व शहरातील वेगवेगळ्या रूग्णालयात हे रूग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली.पुणे शहरात सोमवारी एका दिवसात ३७ रूग्ण आढळले. या सर्वांच्या घशातील स्रावाचे तपासणी अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पुण्यातील पेठांचा पुर्व भाग तसेच कोढवा सारखी ऊपनगरे सील ( घराबाहेर येणे जाणे पुर्णतः बंद) करण्यास सुरूवात केली आहे. यासंबधीचे आदेश प्रशासानाकडून रात्री उशिरापर्यंत जारी होत होते. पुण्यात आतापर्यंत कोराना ने ५ रूग्णांचा बळी घेतला आहे. त्यातच सोमवारी एकदम ३७ रूग्णांंना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळल्यामुळे प्रशासानाची धावपळ ऊडाली आहे. पुणेकरही धास्तावले दिसत आहेत.जिल्हा प्रशासनाने आता बरीच मोठी पुर्वतयारी सुरू केली आहे. त्यात खासगी रूग्णालयांमधील खाटा आरक्षीत करणे, ज्या भागात रूग्ण जास्त संख्येने आढळत आहेत तो संपूर्ण परिसर बंद करणे, त्या भागातील नागरिकांची थेट घरी जाऊन तपासणी करणे अशा ऊपायांचा समावेश आहे.सुदैवाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत तरी कोणत्याही रूग्णांचा म्रुत्यू झाला नव्हता. त्यामुळेच स्थिती अजूनही आटोक्यात येऊ शकते अशा विश्वासातून प्रशासन गतीशील झाले आहे.

पुण्यात सोमवारी 151 नवीन कोरोना संशयित व्यक्तींना विविध रूग्णालयांत दाखल करून घेण्यात आले. यापैकी 38 व्यक्तींचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. यामुळे पुढे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 142 वर जाऊन पोहचली आहे. 

कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या पुणे शहर : 114, पिंपरी चिंचवड: 20, पुणे कॅन्टोनमेन्ट : 1, बारामती: 2, हवेली : 1, जुन्नर: 1, शिरूर: 1 आणि मुळशी : 1 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे