शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; ६४ वर्षीय व्यक्तीचा पिंपरीत उपचार सुरु असताना मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:54 IST

कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे..

ठळक मुद्दे साकोरे, शिनोली, घोडेगाव व पिंगळवाडी गावातील रुग्ण घरी परतल्यामुळे ही गावे कोरोनामुक्त

घोडेगाव : नारोडी (ता. आंबेगाव) येथील ६४ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाला. तालुक्यातील ४३ पैकी १० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने तालुक्यातील लोकांची भीती कमी झाली होती. पण कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.हा रूग्ण मुंबई येथील घाटकोपर येथून २१ मे रोजी आठ जणांच्या कुटुंबासह आला होता. ३१ मे रोजी त्रास होऊ लागल्याने पुणे येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच घरातील ८ व शेजारचे दोन जण अशा दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली.    दरम्यान तालुक्यात सध्या ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. साकोरे, शिनोली, घोडेगाव व पिंगळवाडी या  गावातील रुग्ण घरी परतल्यामुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तसेच गिरवली येथील तीन रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.नारोडी येथील रूग्ण मयत झाल्याबरोबर ग्रामपंचायत व ग्रामस्तरीय समितीला प्रशासनाने सुरक्षे संदर्भात सूचना केलेल्या आहेत. तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे हे सद्य परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. या कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी सोमवार (दि.८) रोजी नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर राम