शिरूरच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:16+5:302021-03-15T04:12:16+5:30
शिरूर तालुक्यात कोरोना बाधित यांचा एकूण आकडा ७ हजार ४१० एवढा झाला आहे. तर ६ हजार ९११ रुग्णांनी कोरोनावर ...

शिरूरच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित वाढले
शिरूर तालुक्यात कोरोना बाधित यांचा एकूण आकडा ७ हजार ४१० एवढा झाला आहे. तर ६ हजार ९११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर १८० जणांचा मृत्यू झाला आहे. ३१९ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शिरूर तालुक्यात रविवारी तालुक्यात शिक्रापूर ८, तळेगाव ढमढेरे २, सणसवाडी १,रांजणगाव गणपती १, टाकळी भिमा १, शिंदोडी१, शिरूर शहर १४, तरडोबाचीवाडी १, न्हावरे १, मांडवगण फराटा १,निमगाव भोगी ४, जातेगाव बुद्रुक १, पाबळ १, कोरेगाव भीमा १ असे तालुक्यांतील १४ गावांत ३८ कोरोना बाधित आढळले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आकडा वाढत चालला आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, करोना बाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी नेहमी तोंडाला मास्क लावणे, गर्दी करू नये गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये,सोशल डिस्टन्स पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.