शिवजयंती उत्सवानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:43+5:302021-02-21T04:20:43+5:30
कार्यक्रमास नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे ,उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी हनुमंतराव पाटील , प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे , तहसीलदार विजय पाटील, विरोधी ...

शिवजयंती उत्सवानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मान
कार्यक्रमास नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे ,उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी हनुमंतराव पाटील , प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे , तहसीलदार विजय पाटील, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, विरोधी पक्ष गटनेते सचिन सातव , भरत शेठ सावले, उस्मानाबादचे तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांच्या हस्ते जिजाऊ व शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विशारद प्रीतम वाडेकर यांनी जिजाऊ वंदना ने केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस. गायकवाड यांनी केले.
शिवजयंती निमित्त घराघरांत ,मनामनांत शिवराय या अंतर्गत घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक सुवर्णा राजेंद्र भापकर, द्वितीय क्रमांक प्रीतम गुळूमकर, तृतीय क्रमांक अनुज राजेंद्र जगताप ,उत्तेजनार्थ शंकर दत्तात्रय चव्हाण यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्रार्थना गाढवे हिने शिवरायांवर पोवाडा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच प्रा. विकास शिंदे यांनी जिजाऊ व शिवराय यांच्या चरित्रावर कविता सादर केली .जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष प्रा. शारदा मदने यांनी मनोगतातून शिवरायांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्त केला.
मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष विकास खोत , मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तावरे, दीपक भराटे , गोविंद वाघ , सुदर्शन निचल , विद्याराणी चव्हाण, तुषार तुपे पदाधिकारी यांच्या सहकायार्तून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला . यावेळी रुपाली गायकवाड, विमल बनकर, रुपाली गायकवाड , हेमंत रंधवे ,अशोक मदने इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीलाराणी रंधवे यांनी केले.