पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:02+5:302021-01-13T04:26:02+5:30
दौंडचे तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी अशोक रासगे, दौंड उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम ...

पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
दौंडचे तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी अशोक रासगे, दौंड उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, यवत ग्रामिण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ थोरात, आशा गटप्रवर्तक रेश्मा गद्रे, यवत कोविड केंद्राचे सफाई कामगार (पतीपत्नी) संगीता व भारत गव्हाणे यांना पत्रकार संघाच्या वतीने ''''कोरोना योद्धा'''' म्हणून घोषित करण्यात आले होते. पत्रकार दिनाच्या दिवशी (दि. ६) यवत येथे त्यांच्या प्रत्यक्ष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार दिनादिवशी एखाद्या पत्राकार संघाकडून असे कौतुक व्हावे ही आनंददायी गोष्ट असल्याची भावना सत्कारार्थींकडून व्यक्त करण्यात आली.
या वेळी तहसीलदार संजय पाटील यांनी लॉकडाऊनकाळात आलेले अनेक कडू-गोड अनुभव त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. या वेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, तालुकाध्यक्ष रविंद्र खोरकर, उपाध्यक्ष राजेंद्र जगदाळे, माजी अध्यक्ष रमेश वत्रे, सचिव संदीप नवले, प्रकाश शेलार, नरेंद्र जगताप यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
१० केडगाव
विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.