शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्याहून उपचारासाठी गेलेली महिला निघाली कोरोनाबाधित; हवेली परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 19:47 IST

संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात तब्बल २७ जण

ठळक मुद्देकदमवाकवस्ती हद्दीत मागील चार दिवसात तब्बल चार जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न

कदमवाकवस्ती: कवडीपाट माळवाडी येथील मिळून आलेल्या तीन कोरोना बधितांपैकी एका महिलेच्या मृत्यूला तीन दिवस पूर्ण होत नाही तोच चौथा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने कदमवाकवस्ती परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनतोय काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी पुण्याहून उपचारासाठी आलेली एक ४५ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.संबंधित महिलेच्या संपर्कात तब्बल २७ जण आले आहेत. त्यामध्ये तिच्या दोन जावयांचा समावेश आहे. त्यामुळे कदमवाकवस्ती परिसरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकट्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागील चार दिवसात तब्बल चार जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.        पुण्यातील लोहियानगर परिसरात राहणारी एक महिला मागील आठ दिवसांपासून आजारी आहे. पुण्यात पुरेसे उपचार न मिळाल्याने ती कदमवाकवस्ती परिसरात राहणा?्या दोन जावयांकडे तीन दिवसांपूर्वी राहण्यास आली होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे जावयांनी तिला फुरसुंगी मार्गावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे तिची रक्त तपासणी व एक्स रे  काढून पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, संबंधित रुग्णालयातील उपचार परवडणार नसल्याने तिला गोळीबार मैदान (पुणे) येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तपासणीत तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे रविवारी (दि. ३) रात्री अकरा वाजता निष्पन्न झाले.संबंधित महिला कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न होताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेचे जावई राहत असलेली वस्ती रविवारी (दि. ३) रात्री अकरा वाजता सील केली. तसेच वस्तीत निजंर्तुकीकरण केले. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन जावायांना तात्काळ कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे.       याबाबत डॉ. जाधव यांनी माहिती दिली की, संबंधित महिलेच्या दोन जावयांसह तब्बल २७ जण संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट मिळताच तिला उपचारासाठी विविध रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या दोघांना तत्काळ कोरोनाच्या टेस्टसाठी हलविले आहे. उर्वरित पंचवीस जणांनाही आज (सोमवारी) दुपारी पुण्यात नेण्यात येणार आहे. महिलेचे जावई राहत असलेल्या परिसरात घरोघरी जाऊन आशा सेविकांच्या माध्यमातून माहिती घेतली जाणार आहे.       ...........कदमवाकवस्ती येथील रुग्णालयात सापडलेली ४७ वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेले एक डॉक्टर व दोन नर्सनंतर नुकत्याच कवडीपाट येथील मृत पावलेली ७० वर्षीय महिला व तिच्या संपर्कात आलेले दोघेजण व आत्ता मिळून आलेल्या ४५ वर्षीय महिलेमुळे कदमवाकवस्ती मधील एकूण कोरोनाबधितचा आकडा ८ वर गेल्याने कदमवाकवस्ती गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे

 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिलाhospitalहॉस्पिटलPuneपुणे