शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 11:45 IST

पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 62 हज्र 979 ऐवढे कोरोना बाधित रुग्ण

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील 75 लोकांवर शनिवार (दि. 2) रोजी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भगवान पवार यांनी दिली. 

याबाबत डाॅ.भगवान पवार यांनी सांगितले, जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 62 हज्र 979 ऐवढे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, 8 हजार 800 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.यात पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व वयोवृद्ध लोक आणि अन्य आजार असलेल्या लोकांना,  तर तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.  या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये म्हणजे पुणे शहरातील 25 लोकांसाठी जिल्हा औंध रुग्णालय येथे, पुणे ग्रामीण भागातील 25 लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माण, मुळशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 25 लोकांसाठी जिजामाता आरोग्य केंद्र पिंपरी-चिंचवड येथे ही रंगीत तालीम करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी, ॲपवर माहिती भरणे आदी सर्व गोष्टीची रंगीत तालीम होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारRajesh Topeराजेश टोपे