शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : गेल्या अडीच महिन्यांपासून पत्ते खेळण्यासाठी जमणाऱ्या अकरापैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:51 IST

थेऊरफाटा परिसरातील एका मोठ्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार..

ठळक मुद्देअकरा खेळाडूंपैकी दोनजण तर उर्वरीत नऊ जणांचे रिपोर्ट येणे बाकी..

लोणी काळभोर : लॉकडाऊन काळात कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका मोठ्या हॉटेलच्या एका खोलीत गेल्या अडीच महिन्यापासुन पत्ते खेळण्यासाठी जमत असलेल्या अकरापैकी दोन जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची धक्कादायक बाब सोमवारी ( २२ जून ) रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.       या हॉटेलमधील रुम नंबर १०६ मध्ये हा डाव रंगत होता अकरा खेळाडूंपैकी दोन जणांचा स्वॅब ( घशातील द्रव ) चा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, उर्वरीत नऊ जणांनी आपआपले स्वॅब विविध प्रयोगशाळेत पाठवले तपासणीसाठी आहेत. त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. दोन कोरोना बाधितांमध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचा समावेश आहे. तर दुसरा हॉटेलच्या व्यवस्थापक आहे.            पुणे - सोलापुर महामार्गावर थेऊरफाटा परिसरातीस एका मोठ्या हॉटेलमधील एका खोलीत लॉकडाऊनच्या काळात गेले अडीच महिन्यापासून थेऊरफाटा व परीसरातील अकरा जण पत्ते खेळण्यासाठी जमत होते. यापैकी दोन जणांना घशाचा त्रास जानवू लागल्याने दोघांनाही उपचारासाठी तीन दिवसापुर्वी पुणे शहरातील दोन वेगवेगळंया रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना स्वॅबचे तपासणी अहवाल सोमवारी दुपारी आले. यात दोघेही कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने, थेऊरफाटा परिसरात खळबळ उडाली आहे. या दोघांसमवेत पत्ते खेळणाऱ्या उर्वरीत नऊ जणांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असुन त्याचा अहवाल मंगळवार दुपारपर्यंत येणे अपेक्षित आहे. या नऊ जणांचा स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतरच पूर्व हवेलीमधील कोरोनाबाबतचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.            याबरोबर पूर्व हवेलीत सोमवार ( २२ जून ) रोजी कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळुन आले आहेत. यामध्ये थेऊर गावातील एक ३५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. हा लोहगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याला घशाचा त्रास जाणवू लागल्याने लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर कोरोगाव मुळ हद्दीतील एक ३२ वर्षीय कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले आहे. ही महिला लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात काम करते. या महिलेला हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलhotelहॉटेल