शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Corona virus : 'होम आयसोलेशन'मधील रूग्णांसाठी ‘टेलिमेडिसीन’,अ‍ॅप्लिकेशन विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:36 IST

पुणे महापालिका हद्दीतील ५०० रुग्णांना आतापर्यंत 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले आहे...

ठळक मुद्देआतापर्यंत ५०० रूग्ण, डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलमधून संवाद  

प्रज्ञा केळकर-सिंग - पुणे : पुणे महापालिका हद्दीत आतापर्यंत सौम्य लक्षणे असणाऱ्या ५०० पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. होम क्वारंटाईन आणि होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आता टेलिमेडिसीन अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये रुग्णांना डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. आयएमच्या सहा डॉक्टरांशीही रुग्णांना आॅन कॉल संवाद साधता येत आहे. तसा प्रस्ताव आयएमएतर्फे आरोग्य विभागाला दिला आहे. 

केंद्र सरकारकडून 'होम क्वारंटाईन' आणि 'होम आयसोलेशन' चे नियम बदलले आहेत. त्यानुसार घरी वेगळी खोली, स्वतंत्र बाथरूम आणि काळजी घेणारी व्यक्ती असल्यास रुग्णांना घरीच अलगीकरण होण्यास परवानगी दिली आहे. होम आयसोलेशन'मधील रुग्णाने , केअर टेकरने काय काळजी घ्यावी याचे सविस्तर नियम सांगणारे माहितीपत्रक दिले आहे. याशिवाय, आपत्कालीन व्यवस्थापन सेलअंतर्गत डॉक्टरांची टीम तैनात केली आहे. डॉक्टरांचे संपर्क क्रमांक, त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचे संपर्क रुग्णांना दिले आहेत. याशिवाय, १०४ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हेल्थ इन्फरमेशन मॅनेजमेंट सिस्टिम सुरू झाली आहे. यासाठी एका खाजगी एजन्सीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.-----टेलिमेडिसीन अ‍ॅप्लिकेशन लवकरच होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईनमधील रुग्णांना उपलब्ध होईल. हे अँप डाऊनलोड करून डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता येईल. याशिवाय, अमेरिकेतील एका एजन्सीशी करार करून कॉल सेंटर सुरू होत आहे. त्यामध्ये ४० डॉक्टरांची टीम २४़ ७ रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असेल. स्लम एरिया वगळता सर्व भागांमधील अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना 'होम आयसोलेशन' करत आहोत.  - डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महापालिका------सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांना 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले जात आहे. पुणे महापालिका हद्दीतील ५०० रुग्णांना आतापर्यंत 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले आहे. - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य विभाग प्रमुख-----होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी सुविधा- रुग्णाने, केअर टेकरने काय काळजी घ्यावी याचे माहितीपत्रक- टेलिमेडिसीन अ‍ॅप्लिकेशन विकसित - आयएमच्या डॉक्टरांशी संवाद- १०४ टोल फ्री क्रमांक- अमेरिकेतील एजन्सीशी करार करून ४० डॉक्टरांची टीम असलेले कॉल सेंटर

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका