शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : टास्क फोर्सने ९५ रुग्णांचे ७३ लाखांचे बिल केले कमी; खासगी रुग्णालयाच्या बिलांवर प्रशासनाची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 13:18 IST

पुणे ,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन..

ठळक मुद्देजिल्ह्यात २० पथकांची स्थापना

निनाद देशमुख 

पुणे: कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिले आकारून त्यांची लूट करणाऱ्या रुग्णांलयांवर प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात लेखा परीक्षक नेमले आहेत. तर जिल्ह्यात 20 भरारी पथके नेमली गेली आहे. १ लाखापेक्षा जास्त  अशा १३२ बिलांचे लेखा परीक्षण पूर्ण केले असून यातील ९५ जणांचे जवळपास ७३ लाख ५६ हजार ५६८ रुपयांची बिले कमी केली आहेत. शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात देखील रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे. शासनाने या परिस्थितीत रुग्णांची लूट होऊ नये म्हणून कोविड सेंटर, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना यांसह अनेक उपाय योजना केल्या.मात्र तरीदेखील अनेक खासगी रुग्णालये रुग्णांना अवाजवी बिले देऊन त्यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रशासनाकडे आल्यानंतर रुग्णायांवर करडी नजर ठेवण्यासाठी 20जुलैपासून पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये प्रशासक तर मंगळवारपासून जिल्ह्यात भरारी पथके नेमले आहेत. 

................................

बिलाबाबत दिलासा

कोरोना रुग्णांना हॉस्पिटलकडून प्रचंड बिल आकारून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य रुग्णांची लूट केली जात आहे. यासंदर्भात नागरिकांकडून विविध तक्रारी दाखल होत होत्या. यासाठी पुणे ,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसात लाखो रुपयांची बिले कमी करण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलकडून जास्तीचे बिल आकारणे देखील कमी झाले आहे. सौरभ राव ,विभागीय आयुक्त

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलSaurabh Raoसौरभ रावdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या