शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाबाधितांच्या एक किमी परिसरातील ५७ हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 12:41 IST

सर्वेक्षणांतर्गत केवळ ६९ नागरिकांना सौम्य सर्दी, खोकला व ताप झाल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देपरदेशातून आलेल्या ११ जणांना होम क्वारंटाईन (घरातच विलग राहण्या)च्या सूचना

पुणे : परदेशवारी करून आलेल्या व पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या घराच्या १ किमी अंतरातील घरांचे व तेथील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम चालू आहे. आत्तापर्यंत ५७ हजार ७९९ नागरिकांचे यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणांतर्गत केवळ ६९ नागरिकांना सौम्य सर्दी, खोकला व ताप झाल्याचे आढळून आले तर, परदेशातून आलेल्या ११ जणांना होम क्वारंटाईन (घरातच विलग राहण्या)च्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ६८ पथकांकडून, १६ मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासस्थान परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या पथकांनी आजपर्यंत १७ हजार ८०५ घरांचे सर्वेक्षण केले असून, त्याद्वारे ४० हजार ७९९ नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना कोरोनासंबंधित लक्षणांची माहिती देऊन तपासणीही केली. २१ मार्च रोजी एका दिवसात ५ हजार ९५७ घरांचे सर्वेक्षण करून १८ हजार ८५५ जणांची वैयक्तिक भेट घेण्यात आली. यामध्ये ११ जण हे परदेशातून आल्याचे आढळून आले असून, त्यांचा परदेशातून आल्याचा कालावधी १४ दिवसांपेक्षा कमी असल्याने त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात आत्तापर्यंत ज्या भागातील व्यक्ती परदेशातून आली आहे व तिला कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, अशांना लागलीच डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.परंतु, त्याच वेळी खबरदारी म्हणून ती व्यक्ती राहत असलेल्या १ किमी परिसरातील घरांचीही तपासणी करण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणालाही कोरोनासंबंधी लक्षणे आढळून आलेली नाहीत. पालिकेच्या या पथकांकडून हे काम नित्याने चालू असून, दररोज शेकडो घरांचे व हजारो नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये संशयित रुग्णाच्या निवासस्थानी व परिसरात जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच, घरातील विलगीकरण कक्ष कसा तयार करायचा, याची माहिती दिली जात असून, त्याचा दैनंदिन अहवाल मुख्यालयाला सादर केला जात असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.०००

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका