शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Corona virus:संतापजनक! पुण्यात 'कोरोना वॉरियर्स'च्या जेवणात निघाले झुरळ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 15:46 IST

कोरोनाची ड़्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखासगी कंपनीकडून निकृष्ट जेवण दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण

पुणे : कोरोना रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या कोरोना वॉरियर्सच्या जेवणात झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या जेवणात झुरळ तर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या प्रसंगी अळई निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव नाराजी आहे. या अगोदर ज्या कंपनीला जेवणाचे कंत्राट देण्यात आले होते त्यांच्या जेवणात देखील हा प्रकार उघकीस आला होता. आता नवीन कंत्राट असणाऱ्या एका खासगी कंपनीकडून अशा पध्दतीचे निकृष्ट जेवण दिले गेल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी निवेदन दिले आहे. 

ससून रुग्णालयात तसेच रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. एका शिफ्टमध्ये साधारण 150 ते 200 कर्मचारी काम करतात. त्यांना कोरोनाची ड़्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र ते जेवण खाण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. त्याबद्द्ल तक्रार केल्याने प्रशासनाकडून जेवणाचे कंत्राटदार बदलण्यात आले. यानंतर नव्याने कंत्राट देण्यात आलेल्या एका कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली न गेल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

बुधवारी दुपारचे जेवण आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणाच्या बॉक्समध्ये झुरळ आढळले. तर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी देण्यात आलेल्या सँडविच मध्ये अळी असल्याचे त्यांनी जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या लक्षात आणून दिले. आता यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याच्या प्रतिक्षेत कर्मचारी वर्ग आहे. यापूर्वी देखील रुग्णालयात कोरोना रुग्ण येण्यास सुरुवात झाल्यापासून ज्या वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोवीड 19 मध्ये काम करण्यासाठी झाली त्यात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील  कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे जे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले काम करीत आहेत त्यांना पुन्हा 'ड्युटी' करावे लागत असल्याची तक्रार कर्मचारी संघटनेने केली आहे. 

.............................................

दोषींवर कारवाई करा आरोग्य प्रशासन आमच्या जीवाशी खेळत आहे. कामाचे वाढवलेले तास, त्याचा मोबदला न देणे, असे प्रकार सुरु आहेत. यावर कुणी आवाज उठवला तर त्याच्यावर कारवाई होते. मात्र जे दोषी आहेत त्यांना कुणी शासन करणार आहे की नाही ? दिवसरात्र आम्ही सफाई कामगार याठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी काम करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याविषयी कुणी बोलायला तयार नाही. मागण्यांचे निवेदनाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आताच्या प्रकरणावर ससून प्रशासनाने कठोर अंमलबजावणी न केल्यास कर्मचारी कामबंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत.

- संजय मेमजादे (अध्यक्ष, अंत्योदय कामगार परिषद ट्रेड युनियन, पश्चिम महाराष्ट्र, पुणे)

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfoodअन्न