शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत सात पोलिसांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:43 IST

आळंदीकरांमध्ये चिंतेचे वातावरण

ठळक मुद्दे शहरातील चार ठिकाणच्या कंटेन्मेट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी

शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता. खेड) येथील पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबत देहू फाट्यावर तीन आणि धाकट्या पादुकाजवळ एक अशा एकूण दहा जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी पाच रुग्ण आळंदी हद्दीबाहेर वास्तव्यास असल्याने शहरातील रुग्णांची संख्या एकूण पाच आहे. मात्र अद्याप काही अहवाल येणे बाकी असल्याने आळंदीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.      मागील आठवड्यात आळंदी पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्यासोबतच्या सतरा पोलिसांची चाचणी करण्यात आली. यापैकी मंगळवारी पाच पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर देहूफाट्यावर तीन व धाकट्या पादुकावरील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.          दरम्यान, आळंदीतील देहू फाटा येथील आर्या आर्केड, साई समृद्धी आणि आळंदी पालिका शाळा नंबर चारमधील कृष्णाई इमारतीकडील रस्ता सील करण्यात आला आहे. शहरातील चार ठिकाणच्या कंटेन्मेट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. बफर झोनमध्ये शिक्षकांच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. तर शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने औषध फवारणी केली जात असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आळंदी शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी आळंदी विकास युवा मंच आणि नगरसेवक सचिन गिलबिले यांनी लेखी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. लग्नासाठी बाहेर गावच्या लोकांना बंदी करून कार्यालयांनाही मज्जाव करणे आवश्यक आहे. भाजी मंडईही आठवडा बाजार बंद करण्याची मागणी आळंदीकरांकडून होत आहे.

टॅग्स :AlandiआळंदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस