शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : ससूनच्या आवारात असलेले "कोविड रुग्णालय" दहा दिवसांतच फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 21:03 IST

पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेले कोविड रुग्णालय दहा दिवसांतच फुल्ल झाले आहे. त्यामुळे तेथील रुग्ण अन्यत्र हलविले जात ...

ठळक मुद्देक्षमता वाढेना : ११ मजली इमारत ठरतेय पांढरा हत्ती

पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेले कोविड रुग्णालय दहा दिवसांतच फुल्ल झाले आहे. त्यामुळे तेथील रुग्ण अन्यत्र हलविले जात आहेत. अकरा मजली इमारत उभी असूनही सध्याच्या परिस्थितीत पांढरा हत्ती ठरत आहे. तिथे सध्या केवळ ११३ रुग्ण असून त्यापैकी ३१ रुग्ण गंभीर आहेत. तर ३३ रुग्ण सणस मैदान येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहेत.कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर ससून रुग्णालयाच्या आवारातील नवीन अकरा मजली इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर तिथे तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत हे काम पुर्ण करून दि. १३ एप्रिलला ही इमारत प्रशासनाला ताब्यात दिली. त्यानंतर तिथे वेगाने रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात अतिदक्षता विभागात ५० व विलगीकरण कक्षात १०० अशा एकुण १५० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. पण त्यानंतर ही क्षमता वाढलेली नाही. एकीकडे रुग्ण वाढत असताना कोविड रुग्णालयाच्या क्षमतेत वाढ होत नसल्याने रुग्णांना अन्यत्र हलविण्याचे वेळ प्रशासनावर आली आहे. तसेच जागेअभावी आलेल्या रुग्णांना नकार द्यावा लागत असल्याची परिस्थती निर्माण झाली आहे.रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ह्यरुग्णालयातील स्थिर स्थितीतील कोरोनाबाधित ३३ रुग्ण सणस मैदान येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या ११ मजली इमारतीत सध्या ११३ रुग्ण दाखल आहेत. सणस मैदान येथील रुग्णांवरही ससूनमधील डॉक्टरांकडूनच उपचार करण्यात येत आहेत. याविषयी ४४ संशयित रुग्ण नवीन इमारतीत आहेत. एकुण बाधित रुग्णांपैकी ३१ गंभीर असून तिघे व्हेंटिलेटरवर आहेत.ह्ण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या गंभीर स्थितीतील रुग्णांना प्राधान्य दिले जात आहे. स्थिर असलेले रुग्ण जागेअभावी इतर ठिकाणी पाठविले जात आहेत. काहीवेळा गंभीर रुग्णांनाही जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही इतरत्र पाठवावे लागते.-----------------रुग्णालयाला जवळपास ४०० रुग्णांची व्यवस्था होईल, यानुसार चार मजले तयार करून दिले आहेत. पण कोरोनामुळे बेडमधील अंतर वाढल्याने ही क्षमता कमी झाली आहे. इतर मजले सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. सध्या कामगार न मिळण्यासह इतरही काही अडचणी आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनी सांगितले.------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस