शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:12 IST

पुण्यातील रुग्ण तिथे घेऊ शकणार उपचार

ठळक मुद्दे२० व्हेंटिलेटर्स बेड आणि ८० ऑक्सिजन बेडचा समावेश

पुणे : कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्यावतीने आयसीयू आणि ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकतेच पुणे छावणी परिषदेने पालिकेला कोरोनकरिता सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय उपलब्ध करून देण्यास संमती दिली आहे. त्यामुळे पालिकेला आणखी १०० बेड्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये २० व्हेंटिलेटर्स बेड आणि ८० ऑक्सिजन बेडचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी दिली. 

शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खाटा कमी पडू लागल्या आहेत. विशेषतः ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स असलेल्या खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे विविध महाविद्यालये, शाळांमध्ये सेंटर्स सुरू केली जात आहेत. यासोबतच शहरातील विविध रुग्णालयांसोबत करार करून खाटा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांनी कॅन्टोन्मेंटचे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय पालिकेला कोरोनासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. कॅन्टोन्मेंट आणि पालिकेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हे रुग्णालय कोरोना उपचारांसाठी पालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच करार केला जाणार असून पालिकेला एकूण १०० खाटा उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या हद्दीतील रुग्ण याठिकाणी उपचार घेऊ शकणार आहेत. ---------- सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या एकूण १०० खाटा उपलब्ध होणार असून यातील २० खाटा या व्हेंटिलेटर्सच्या असून ८० खाटा ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. यातील ४० खाटा प्रत्यक्ष ताब्यात आल्या आहेत. यामध्ये १० व्हेंटिलेटर्स आणि ३० ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे. ----------- कोरोनामुळे पालिकेला खाटा कमी पडू लागल्या आहेत. कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय पालिकेला कोरोनासाठी देण्यासाठी प्रयत्न केले त्याला यश आले. याठिकाणी १०० खाटा उपलब्ध होणार असून रूग्णांची सोया होणार आहे. - सुनील कांबळे, आमदार 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस