शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू ; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:23 IST

आत्तापर्यत 60 आरोपींची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका 

ठळक मुद्देजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भागवत यांची माहिती सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या आरोपींना सोडणार 

पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली आहेत. कारागृहात असणारी कैद्यांची संख्या लक्षात घेता त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून सत्र व जिल्हा न्यायाधीश यांना दिले आहे. आत्तापर्यत ५० ते ६० आरोपीना वैयक्तिक जातमुचलक देण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली. गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्गात वाढ होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्य न्यायालयात रिट पिटिशन  दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाला उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समितीने ज्या गुन्हयात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली व ते आरोपी महाराष्ट्रात राहतात अशा आरोपीना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडणायचे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांनी त्या दृष्टीकोनातून परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक सत्र व जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आले आहे त्यानुसार ज्या गुन्हयात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली अशा ५० ते ६० आरोपीना वैयक्तिक जातमुचलका दिला आहे. 

..................कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहात बंदी असलेल्या सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना पॅरोल वर कारागृहातून सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्याप याबाबत लिखित आदेश आम्हला प्राप्त झाला नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कारागृहातून कैदी 45 दिवसांच्या पॅरोलवर सोडू शकतो. पण त्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात परतावे लागणार आहे. कारागृहातून सोडण्यात येणारे कैदी त्यांच्या घरापर्यंत कसे पोहचतील याबाबत न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.- यु टी पवार, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक,  येरवडा

टॅग्स :Yerwadaयेरवडाyerwada jailयेरवडा जेलPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस