शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Pune: पुणेकरांसाठी सकारात्मक बातमी! कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 21:15 IST

पुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४९ झाली आहे.

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक राहिले. शनिवारी दिवसभरात २ हजार ८३७ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ४ हजार ६७३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४०३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून हा आकडा ३६ हजार ५८६ झाला आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४०३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ४०२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ३०४ झाली आहे. पुण्याबाहेरील २३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४ हजार ६७३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४४ हजार ५३९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३६ हजार ५८६ झाली आहे.  -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७ हजार ११८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख ६२ हजार ९८१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल