शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Corona virus in pune : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहचला आता १८ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:35 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांच्यावर गेले असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा

ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास वाढले तीन पटीने

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १८ दिवसांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसांचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदर घटण्याचा वेग कमी असला तरी पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांच्यावर गेले असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६ ते ७ दिवसांचा होता. तर मृत्यूदर १० टक्क्यांहून अधिक होता. ही स्थिती बदलण्यास जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास तीन पटीने वाढले आहे. 

दुपटीचा कालावधी वाढलादि. ७ जूनची रुग्णसंख्या गृहित धरल्यास शहरात ७८८१ रुग्णसंख्या होती. हा आकडा दुप्पट होण्यासाठी जवळपास १८ दिवसांचा कालावधी लागला आहे. दि. २० मे रोजी ३८९९ रुग्ण होते. तर दि. ६ मे रोजी २०२९ रुग्णसंख्या होती. ती दुप्पट होण्यासाठी १४ दिवस लागले. त्याआधी हा कालावधी १२ दिवसांचा होता. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सुरूवातीला दुपटीचा कालावधी सहा ते सात दिवसांचाच होता. देशाच्या तुलनेत हा कालावधी तीन ते चार दिवसांनी कमी होता.

मृत्यूदर घसरतोयएप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहराचा मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. हा दर जवळपास १३ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. प्रामुख्याने ससून रुग्णालयांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते. पण रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही आता हा दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. मृत्यूदर कमी होण्याचा वेग अत्यंत धीमा आहे. 

बरे होण्याचे प्रमाण लक्षणीयशहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे उपचारानंतर घरी जाणाऱ्या  रुग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे. सोमवारपर्यंत एकुण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६३ टक्के एवढे होते. मे महिन्याच्या सुरूवातीस हे प्रमाण केवळ २४ टक्क्यांच्या जवळपास होते. रुग्णांना घरी सोडण्याच्या धोरणामध्ये बदल करण्यात आल्याने हे प्रमाण वाढल्याचे दिसते.------------------

पुणे शहराची कोरोनाची स्थिती (कंसात टक्केवारी)दिवस            एकुण रुग्ण              बरे झालेले                  मृत्यू३ मे                १८१७                       ४३३ (२३.८३)             १०१ (५.५५)१० मे             २४८२                       १०२० (४१.०९)           १४५ (५.८४)१७ मे              ३४९६                      १७५१ (५०.०८)          १९४ (५.५४)२४ मे              ४७८२                      २५५० (५३.३२)          २५५ (५.३३)३१ मे              ६४७२                       ३७८२ (५८.४३)         ३१४ (४.८५)७ जून             ७८८१                       ५०१९ (६३.६८)         ३७८ (४.७९)-----------------------------------------------------रुग्ण दुपटीचा कालावधीदिवस एकुण रुग्णसंख्या कालावधी२४ एप्रिल ९८० -६ मे २०२९ १२२० मे ३८९९ १४७ जून ७८८१ १८----------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका