शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Pune: सकारात्मक! पुणे शहरात रविवारी दिवसभरात ७०९ नवे रुग्ण; तर २ हजार ३२४ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:07 IST

आठवडयात चौथ्यांदा रूग्णसंख्या एक हजारच्या आत

ठळक मुद्देशहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून गंभीर रूग्ण संख्या १ हजार २९१ इतकी आहे.

पुणे: कोरोनाबाधितांची संख्या या आठवड्यात चौथ्यांदा एक हजाराच्या आत आली असून, रविवारीही ७०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २ हजार ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारी पुण्यातील सक्रिय रूग्णसंख्या १० हजारपर्यंत आली असून, सध्या शहरात १० हजार ६७६ सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात ९ हजार ५६ जणांनी तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७.८३ टक्के इतकी आहे़. दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहे. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७१ टक्के इतका आहे़.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर गंभीर रूग्ण संख्याही १ हजार २९१ इतकी आहे़.  शहरात आत्तापर्यंत २४ लाख ३६ हजार ४४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६५ हजार ६२५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ४६ हजार ९४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ८ हजार ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसdocterडॉक्टर