शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेची 'डॅशबोर्ड' आकडेवारीशी जुळवाजुळवीसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 17:13 IST

महापालिकेची आकडेवारी आणि डॅशबोर्डवरील आकडेवारी जुळत नसल्याने आकडेवारीचा गोंधळ अद्यापही कायम.

पुणे : महापालिकेकडून दररोज कोरोना रुग्णांसंदर्भात प्रसिध्दीस दिल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये व्हेंटिलेटर्सवरील रुग्णांची संख्या वाढल्याचे दर्शविण्यात आल्याने  आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उपलब्ध खाटांची संख्या 'डॅशबोर्ड' सोबत जुळविण्याचा खटाटोप पालिकेने चालविल्याचे दिसून येत आहे.  

पुणे महापालिकेकडून दररोज शहरातील कोरोना रुग्णांची संख्या, सक्रीय रुग्ण, घरी सोडण्यात आलेले रुग्ण, कोरोना मृत्यू यासह व्हेंटिलेटर्सवरील रुग्ण, आयसीयूमधील रुग्ण याची माहिती दिली जाते. या फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला असून आयसीयूमधील व्हेंटिलेटर्सवरील रुग्ण, आयसीयूमधील विना व्हेंटीलेटर्सचे रुग्ण, आॅक्सिजनवर ठेवण्यात आलेले रुग्ण अशी वर्गवारी करुन त्याचा आकडा देण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने व्हेंटिलेटर्सवरील आकडेवारी वाढविल्याची शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील आयसीयू, व्हेंटि लेेेटर्स, आॅक्सिजन बेडची उपलब्धता दर्शविण्यासाठी आणि त्याची माहिती नागरिकांना समजण्याकरिता डॅशबोर्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  परंतू, महापालिकेची आकडेवारी आणि डॅशबोर्डवरील आकडेवारी जुळत नसल्याने आकडेवारीचा गोंधळ अद्यापही कायम आहे. हा गोंधळ दूर करण्याकरिता डॅशबोर्डाच्या टर्मिनोलॉजीप्रमाणे आता पालिका व्हेंटिलेटर्स आणि आॅक्सिजनवरील रुग्णांची माहिती देणार आहे. एकंदरीत पालिका डॅशबोर्डावरील आकडेवारीसोबत स्वत:चे आकडे जुळविण्याचा खटाटोप करीत असल्याचे चित्र आहे. =====कोरोनाबाबतच्या प्रसिद्धीपत्रकाच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. रुग्णालयील आयसीयूमधील व्हेंटिलेटर्सवरील असणारे व नसणारे रुग्ण, रुग्ण, आॅक्सिजनवरील रुग्णांचा आकडा डॅशबोर्डासोबत लिंक करण्यात येत आहे. यापूर्वीही आकड्यांमध्ये तफावत नव्हती आणि आजही नाही. केवळ सुटसुटीतपणा आणून दोन्हींचे स्वरुप सारखे करण्याचा प्रयत्न केला आहे. - डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस