शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेचे आता खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे 'विमाकवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 11:18 IST

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना विमा सुरक्षा कवच व कोरोनाची बाधा झाल्यास उपचाराचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील खाजगी डॉक्टर यांचीही सेवा उपलब्ध व्हावी. यासाठी पुणे महापालिकेकडून, शहरातील खासगी डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना अंशदायी योजनेंतर्गत उपचाराचा खर्च तसेच ५० लाख रूपयांचे विमा कवच मिळणार आहे. 

कोरोना संकटात काम करणाऱ्य खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना अंशदायी योजनेंतर्गत उपचाराचा खर्च तसेच ५० लाख रूपयांचे विमा कवच देण्याच्या या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या आणि तातडीने विमा कंपनीच्या नियुक्तीसाठी अल्पकालीन निविदा काढावी, व ही निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे आणावी, असे आदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सेवांमध्ये महापालिकेला अधिकाअधिक डॉक्टर्सची सेवा उपलब्ध व्हावी याकरिता प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने नुकतीच खासगी डॉक्टर संघटनांसोबत बैठकही घेण्यात आली होती.या बैठकीत झालेल्या चर्चेत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना विमा सुरक्षा कवच व कोरोनाची बाधा झाल्यास उपचाराचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सदर प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली असली तरी, कोरोनाच्या काळात खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, फॅमिली डॉक्टर्स किती आहेत, किती डॉक्टर्स स्वतंत्र व्यवसाय करून, अन्य रुग्णालयातही सेवा देत आहे. याची माहिती घेऊनच विमा कंपनी नियुक्तीसाठी अल्पकालीन निविदा राबवावी असेही समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल