शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेकडून शहरातील ७१ ठिकाणे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 10:42 IST

कोरोना संसर्गाचा प्रभाव जास्त असलेले भागाचा दर आठवड्याला महापालिकेकडून आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देया भागात जाणारे-येणारे रस्ते पत्रे लावून बंद करण्यात येणारया क्षेत्रांमध्ये बाहेरील व्यक्तींना अथवा तेथील व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असणार

पुणे : शहरात कुठलीही जमावबंदी लागू करण्यात येणार नसल्याचे नुकतेच स्पष्ट झाले असले तरी, ज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. अशी शहरातील ७१ ठिकाणे महापालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेत आता कोरोनाबाधितांची संख्या अधिक असलेला भागच सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात येत असून, दर आठवड्याला आढावा घेऊन कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेला भाग हा या क्षेत्रांमधून वगळण्यातही येत आहे.         ३ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात शहरात ७४ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) जाहीर करण्यात आली होती.तर १९ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशात २० प्रतिबंधित क्षेत्रे की जेथील कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आल्याने वगळण्यात आली आहेत. मात्र नव्याने १७ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, सदर क्षेत्रांमध्ये बाहेरील व्यक्तींना अथवा तेथील व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. तसेच या भागात जाणारे-येणारे रस्ते पत्रे लावून बंद करण्यात येतील.           राज्यासह पुणे शहरातही अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येत असली तरी, कोरोनाचा संसर्गाचा प्रभाव जास्त असलेले शहरातील भाग दर आठवड्याला महापालिकेकडून आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात येत आहेत.याच प्रक्रियेत शहरातील ७१ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आले असून, येथील अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहारांवर १९ सप्टेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत.     

नव्याने जाहिर करण्यात आलेल्या १७ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोरपडी,स.नं. ४९ पै़पाम ग्रु सोसायटी, घोरपडी स. नं.४५ पै़लक्ष्मी टेरेस सोसायटी, शिवाजीनगर भांबुर्डा, स.नं१०२ पै़आशानगर को ऑप. हौ़सोसायटी, भांबुर्डा स.नं ९८,९९ पैकी गोखलेनगरच्या कुलकर्णी शाळेसमोरील भाग, वडगाव शेरी स.नं ५३ पैक़ुमार प्राईम वेरा, वडगाव खुर्द स.नं. ३४ पै़मँगो नेस्ट सोसायटी, वडगाव बु. स.नं. १४,१५ सनसिटी माणिकबाग सिंहगड रोड, हिंगणे खुर्द स.नं १५ व ३५ पै़आनंदनगर संपूर्ण, धायरी स. नं१४७ पैग़ल्ली नं. १७ येथे प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आले आहे.

धनकवडी बालाजीनगर स. नं २० ते २४ पै सिध्दी हॉस्पिटल परिसर, खुशबू हॉस्टेल परिसर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल परिसर, रजनी कॉर्नर येथे, कोंढवा बु़ येथील सर्व्हे ६० ते ६४ मध्ये शांतीनगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर, साईनगर गल्ली नं१ ते ९,स.नं ३,८,९ पैकी कपिलनगर, लक्ष्मीनगर भाग नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेश येईपर्यंत जाहिर करण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या