शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेकडून पाच बड्या रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 13:53 IST

पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा फुगत चालला आहे. आॅक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटीलेटरच्या खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देरुग्णालयातील खाटांचे नियंत्रण पालिकेच्या कोविड नियंत्रण कक्षाकडून केले जाणार

पुणे : शहरातील वाढती कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि खाटांची कमतरता यामुळे पालिकेने काही रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. नव्याने इनलॅक्स बुधरानी, सह्याद्री-हडपसर, नोबल रुग्णालय, भारती हॉस्पिटल-कात्रज, पुना हॉस्पिटल या पाच रुग्णालयातील खाटा नियंत्रित करण्यात आल्या आहेत. याठिकाणी पालिकेकडूनच रुग्ण पाठविण्यात येणार आहेत. पालिकेकडून याला ‘खाटा नियंत्रित’ केल्या असे गोंडस नाव देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या खाटांचे नियोजन पालिकेकडे असणार आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा फुगत चालला आहे. आॅक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटीलेटरच्या खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. खाटा कमी आणि रुग्ण अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णालयांकडून त्यांच्याकडील उपलब्ध खाटांची माहिती डॅशबोर्डवर अपडेट केली जात नसल्याने खाटा अडवून ठेवल्याच्या तक्रारी  येत आहेत. पालिकेकडून या रुग्णालयांना वारंवार सूचना देऊनही गांभिर्याने घेतले जात नसल्याचे दिसते आहे. पालिकेने यापुर्वीच काही रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित केल्या आहेत. 

प्रशासनाने शुक्रवारी इनलॅक्स बुधरानी, सह्याद्री-हडपसर, नोबल रुग्णालय, भारती हॉस्पिटल-कात्रज, पुना हॉस्पिटल या पाच रुग्णालयातील खाटा नियंत्रित करण्याच आदेश काढला आहे. या रुग्णालयातील खाटांचे नियंत्रण पालिकेच्या कोविड नियंत्रण कक्षाकडून केले जाणार आहे. रुग्णांना आवश्यकतेनुसार, या खाटा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जे नागरिक महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये पात्र आहेत अशांच्या उपचारांचा रुग्णालयाचा खर्च पालिका देणार आहे. तर, जे नागरिक या योजनेमध्ये पात्र नाहीत त्यांचा खर्च नागरिकांना स्वत:च करावा लागणार आहे. शासनाच्या निकषांनुसारच उपचारांच्या खर्चाचे नियम पाळले जाणार असल्याचे अतिरीक्त आयुक्त शांतनू गोयल यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्या