शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Pune : पुणे जिल्ह्यातील बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक कोरोना हॉटस्पॉट गावे व क्रियाशील रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 20:21 IST

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. 

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रात अद्याप अपेक्षित प्रमाणात कोरोनाचा धोका कमी झाला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आजही दररोज साडे तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये जिल्ह्यात बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावे व क्रियाशील रुग्ण आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी केली व नियमांचे उल्लंघन केल्यास तिस-या लाटेला लवकरच निमंत्रण देऊ, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आणि क्रियाशील रुग्ण बारामती आणि जुन्नर तालुक्यात आहेत. तर जिल्ह्यात आजही 91 गावे कोरोनाची हॉटस्पॉट गावे आहेत. जिल्ह्यात जुन्नर,  आंबेगाव  आणि दौंड या तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावांचा समावेश आहे. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक हॉटस्पॉट गावे असलेल्या खेड आणि मावळ व भोर आणि वेल्हा आज एक ही गाव हॉटस्पॉटमध्ये नाही. 

जिल्ह्यात बारामती तालुक्यात तब्बल 940 क्रियाशील रुग्ण असून 680 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर जुन्नर तालुक्यात 523 कोरोना बाधित रुग्ण व क्रियाशील रुग्णांची संख्या 751 च्या घरात गेली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हद्दीत सर्वाधिक ६६ क्रियाशील कोरोना रुग्ण आहेत. घोडेगावपाठोपाठ याच तालुक्यातील मंचर येथे ५७ तर, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ५४ क्रियाशील कोरोना रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून हे उघड झाले आहे. जिल्ह्यातील एकूण हॉटस्पॉट गावांपैकी सर्वाधिक २५ गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. जुन्नरपाठोपाठ बारामती तालुक्यातील १५, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी बारा आणि दौंड तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे.----जिल्ह्यात सर्वाधिक हॉटस्पॉट तालुके व गावांची संख्या जुन्नर 25,  बारामती 15, इंदापूर 12, आंबेगाव 12, दौंड 10, शिरूर 7, हवेली 6 पुरंदर 3, मुळशी 1 , एकूण 91 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवार