शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पार ; २६६ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 19:35 IST

पुणे शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २८७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे.

पुणे : शहरात बुधवारी गेल्या काही दिवसांत प्रथमच ५०० च्यावर कोरोनाबाधित आढळून आले असून ही संख्या ५०८ इतकी आहे. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७०७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७.५७ टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची सरासरी टक्केवारी ५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने, लॉकडाऊनमध्ये शिथिल केलेले निर्बंध पुन्हा काही प्रमाणात वाढविण्यात आले. परंतु, जून महिन्याच्या प्रारंभी दिलेली लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढवून गेल्याचे आता काही प्रमाणात समोर येऊ लागले आहे. दरम्यान, आज दिवसभरात २६६ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे. सध्या शहरात २ हजार ५५७ कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २८७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे.शहरात आत्तापर्यंत २६ लाख ६७ हजार ९६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७८ हजार ५१७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६७ हजार ३७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या