शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

corona virus ; माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा ; पुण्यात रिक्षाचालकांची नायडू कर्मचाऱ्यांना मोफत सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:24 IST

नायडू रुग्णालयात कामासाठी जाणाऱ्या सर्वांना ही सेवा मोफत उपलब्ध असून त्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

पुणे : शहरात संचारबंदी लागू असताना सर्व वाहतूक बंद झाली आहे. अशावेळी आपत्कालीन सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांना पुण्यातील  छावा संघटनेतर्फे सोडण्यात येत आहे. नायडू रुग्णालयात कामासाठी जाणाऱ्या सर्वांना ही सेवा मोफत उपलब्ध असून त्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. जर आपत्कालीन सेवा देणाऱ्या व्यक्तींना रुग्णालयात  वेळेवर पोहोचता आले नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते हाच विचार करून ही सेवा सुरु आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात सापडला. आत्ताच्या घडीला पुण्यात २० तर पिंपरीत १२ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पहिल्या रुग्णाला मुंबई-पुणे टॅक्सी सेवा देणाऱ्या चालकालाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे घाबरलेल्या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांनी नायडू रुग्णालय आणि त्याशी संबंधित व्यक्तींना सेवा देणे बंद केले. त्यातच आता पीएमपी बस बंद आहेत. रविवारी जनता कर्फ्यू पाळला गेला. त्यावेळी आरोग्य सेवा देणाऱ्यांना उशीर होऊ नये म्हणून छावा संघटना पुढे आली असून त्यांनी यासाठी तीन रिक्षांची सेवा सुरु केली आहे. त्यांना जर नायडू रुग्णालयात जायचे असल्याचा फोन केला तर ते तात्काळ सेवा पुरवतात. 

याबाबत नायडूत सेवा देणाऱ्या डॉ प्रवीण चौधरी यांनाही अनुभव आला आहे. चौधरी यांची गाडी अचानक नादुरुस्त झाल्याने  आता सेवा द्यायला कसे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर लोकमतमध्ये दिलेल्या असलेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी फोन केला आणि त्या डाँक्टरांना वेळेत नायडू रूग्णालयात पोचता आले. दुपारी आकाश कसबे या रिक्षाचालकाने त्यांना नायडू मध्ये सोडले, तर रात्री रूग्णालयातून घरी किशोर मोरे यांनी सोडले. डाँक्टरांसोबतच अनेक नर्स आणि इतरांना नायडू रूग्णालयात सोडण्याचे काम या संघटनेकडून होत आहे. आज देखील ही सेवा सुरू आहे. 

कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व स्टाफची सेवा करता आली. प्रशासनाला आणि शासन यांना खारीचा वाटा म्हणून सहकार्य करू शकलो. काल रात्र पाळी केलेले नायडू हॉस्पिटल मधील कर्मचारी यांना हॉस्पिटलमध्ये वेळेत आणता आले, याचा आनंद असल्याची भावना रिक्षाचालक किशोर मोरे, विशाल टकले व आकाश कसबे यांनी व्यक्त केल्या. नायडू हॉस्पिटल ते मोशी , चिखली , पिंपरी , काळेवाडी , आळंदी ,भोसरी , दापोडी, खराडी , मांजरी ,हडपसर , मुंढवा , स्वारगेट , कोथरूड , वारजे , गंगाधाम चौक अशा अनेक ठिकाणी ही मोफत वाहन सेवा देण्यात आली. आज देखील सुरू असल्याची माहिती संघटनेचे धनंजय जाधव यांनी 'लोकमत' ला दिली. आवश्यकता असल्यास 8983904888 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसauto rickshawऑटो रिक्षाdoctorडॉक्टर