शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 00:09 IST

बहुतांशी रूग्ण हे ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारत असल्याने,महापालिकेचे अनेक कोविड केअर सेंटर रिक्त होऊ लागले आहेत.

ठळक मुद्दे पुणे महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २१ ठिकाणी उभे केले होते कोविड केअर सेंटर

पुणे : कोरोना संसर्ग झालेले बहुतांशी रूग्ण हे ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारत असल्याने, महापालिकेचे बहुतांशी कोविड केअर सेंटर रिक्त होऊ लागले आहेत. यामुळे सद्यस्थितीला महापालिकेने आठ कोविड केअर सेंटर तात्परुत्या काळापुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णवाढही पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात होत आहे. तर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रूग्णांना ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय महापालिकेने उपलब्ध करून दिला असल्याने, अनेक जण कोविड केअर सेंटरमध्ये राहण्यापेक्षा घरी जाणे पसंत करीत आहेत. यामुळे शहरातील २१ कोविड केअर सेंटर पैकी बहुतांशी ठिकाणी ५० टक्केच कोविडचे रूग्ण राहत आहेत. तर काही ठिकाणी सेंटरच्या एकूण क्षमतेच्या पाच दहा टक्केही रूग्ण नाहीत. परिणामी अशी आठ कोविड केअर सेंटर काही काळापुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. या आठ कोविड केअर सेंटरमध्ये प्रामुख्याने सिंहगड कॉलेजची एक पूर्ण बिल्डिींग, संत ज्ञानेश्वर हॉस्टेल यांचा समावेश आहे.     पुणे महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २१ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे केले होते. यामध्ये साधारणत: १२ हजार बेड ची (रूग्ण क्षमता) क्षमता आहे. परंतु, होम आयसोलेशन मुळे हजारो रूग्ण घरी गेल्याने,  ५ हजार खाटांची क्षमता असलेले ८ कोविड केअर सेंटर काही काळापुरते बंद करण्यात येणार आहेत.                                     

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल