शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Corona virus : 'तक्रारींचा पाऊस'अनुभवलेले जम्बो हॉस्पिटलचं चित्र बदलतेय; महापौरांकडून प्रत्यक्ष पाहणी व रुग्णांशी संवाद   

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 1:48 PM

क्षमता पाहूनच पालिकेकडून टाकली जात आहेत पाऊले , लवकरच आणखी १०० बेड सुरू

ठळक मुद्देदोन दिवसात येथे आणखी १०० ऑक्सिजन बेड व ६० आयसीयू बेड पूर्णपणे कार्यरत होणारजम्बो हॉस्पिटलमधून १७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

पुणे : पुण्यातील जम्बो हॉस्पिटल म्हणजे असुविधांचे भांडार, अपुरी वैद्यकीय उपचार यंत्रणा, रुग्णांची हेळसांड यांसारख्या अनेक तक्रारी समोर आल्याने प्रतिमा झालेले हे हॉस्पिटल आता नवी कात टाकू लागले आहे. तक्रारींचा पाऊस अनुभवलेल्या जम्बो चे रुपडे पालटू लागले आहे. हळूहळू येथील आरोग्य यंत्रणा सक्षम होतेय तसेच आता इथून रुग्ण बरे होऊन घरी जाण्यास देखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महापालिकेने उभे केलेल्या जम्बो हॉस्पिटलबद्दल आता आशादायी व सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले आहे.  

पुणे महापालिकेने जम्बो हॉस्पिटलकडे विशेष लक्ष देऊन, आपल्या क्षमतेप्रमाणेच येथे रूग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे. येत्या दोन दिवसात येथे आणखी १०० ऑक्सिजन बेड व ६० आयसीयू बेड पूर्णपणे कार्यरत होणार असून, यात ३० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती  रुबल अगरवाल व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीपीई किट घालून जम्बो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत तेथील आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय उपचार पद्धती,रुग्णांची परिस्थिती पाहणी केली. तसेच यादरम्यान स्वतः २० रूग्णांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली.तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना देखील यावेळी महापौरांनी दिल्या. सद्यस्थितीला १७८ कोविड-१९ चे रूग्ण उपचार घेत असून, यापैकी ३८ जण आयसीयूमध्ये तर ११ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनची जबाबदारी असलेल्या लाईफ लाईन एजन्सीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असताना, त्याचवेळी महापालिकेने विविध एजन्सींच्या माध्यमातून ५९ डॉक्टर व १४० पॅरामेडिकल स्टाफ येथे उपलब्ध करून देऊन रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याची व्यवस्था केली आहे. 

    जम्बो हॉस्पिटलमधील उपलब्ध डॉक्टर व अन्य वैद्यकीय सेवक वर्ग लक्षात घेता, येथे आणखी नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी हॉस्पिटलमध्ये नवीन रूग्ण दाखल करून घेतला जाणार नाही.दरम्यान हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कधी चालू होईल याची निश्चित तारीख रविवारी जाहिर करू असेही महापालिकेने सांगितले आहे.     जम्बो हॉस्पिटलमध्ये जे रूग्ण सध्या उपचार घेत आहेत, त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रकारची औषधे ही महापालिकाच पुरविणार असून, हॉस्पिटलमध्ये २ कोटींची औषधे पूर्वीपासूनच पुरविण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले. तर नव्याने रूग्ण दाखल प्रक्रिया सुरू केल्यावर त्यांना आवश्यक औषधे कशारितीने द्यावयाची याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाच्या आदेशानुसार घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.     ----------जम्बो हॉस्पिटलमधून १७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले    जम्बो हॉस्पिटलमधून रविवारपासून रूग्ण घरी परतू लागले असून, मंगळवारी रात्रीपर्यंत १७ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महापालिकेने व्हिडिओ कॉन्स्फरंसिंगच्या माध्यमातून रूग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली असून, आज महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल हे स्वत: पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये गेले व त्यांनी २० रूग्णांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. ----------------- 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्या