शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा १०४  कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 21:44 IST

 कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होण्याची संख्याही नित्याने वाढत आहे.

ठळक मुद्देसद्यस्थितीला ७७० कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी ४१ जणांची प्रकृती गंभीर पुणे शहरातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ६४

पुणे : पुणे शहरात सलग दुसºया दिवशी कोरोनाबाधितांची संख्या शंभरीने वाढली असून आज पुन्हा १०४ नवे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन दिवसात हा शंभरानेच वाढत असून, आज शहरातील एकूण रूग्ण संख्या ९८० झाली आहे. तर आज नव्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आणखी १६ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले परतले.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत १०४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलही आता कमी पडू लागल्याने, बालेवाडी येथील क्वारंटाईन सेंटरला आता आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे..  या ठिकाणी दाखल असलेल्या संशयितांपैकी २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, येथील रूग्णांसह पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य हॉस्पिटलमध्ये ७१ रूग्ण आहेत. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये १२ तर ससून रूग्णालयामध्ये २१ रूग्ण उपचार घेत आहेत.     पुणे शहरातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ६४ झाली आहे. आज मृत्यू पावलेल्या चार रूग्णांमध्ये कॅम्प परिसरातील ३२ वर्षीय शिक्षिकेचा समावेश आहे. या महिलेला गुरूवारी केईएम रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती मृतावस्थेतच होती़ त्यामुळे तीची वैद्यकीय चाचणी केली असता तिला कोरोनाची लागण झाल्याचे आज आढळून आले. याचबरोबर ससूनमधील पर्वती दर्शन येथे राहणाºया ६१ वर्षीय महिलेचा रात्री उशिरा मृत्य झाला़ तर शिक्रापूर येथील रहिवाशी असलेल्या ४० वर्षीय पुरूषाचाही आज मृत्यू झाला़ तसेच मंगेशकर हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.      कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होण्याची संख्याही नित्याने वाढत आहे. आज नव्याने १६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या १४६ झाली आहे. सद्यस्थितीला ७७० कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी ४१ जणांची प्रकृती गंभीर आहे.यामध्ये ससून हॉस्पिटलमधील २९ जणांचा समावेश असून, ४ जण व्हेटिलेटरवर आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर