शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबधितांचा आकडा सहा हजार पार; दिवसभरात २४२ रूग्णांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:43 IST

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६६ जणांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देतब्बल १६६ रुग्ण अत्यवस्थ तर १० रूग्णांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या झाली ३ हजार ४५०

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये २४२ रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ६ हजार ९३ झाली आहे. तर दिवसभरात बरे झालेल्या १८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्षात  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २४० झाले आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १६६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २५२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १३७ तर खासगी रुग्णालयांमध्ये ८८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३०३ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२७ रुग्ण, ससूनमधील ०९ तर  खासगी रुग्णालयांमधील ५० रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ४५० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३४० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ११७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४७ हजार ७६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५८८, ससून रुग्णालयात १४६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMayorमहापौर