शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १६ हजारांच्या घरात; आतापर्यंत ६०४ रुग्णांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 12:17 IST

पुणे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत ३५२ नवीन रुग्ण वाढ

ठळक मुद्देशहरात दिवसभरात २१२ रूग्णांची वाढआतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवार (दि.२२) रोजी एका दिवसांत ३५२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ हजार ३१ झाली असून, एकूण मृत्यू ६०४ वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये सुट दिल्यानंतर रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरीभागासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत. यात कन्टमेन्ट झोन बाहेर रूग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहेत. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांकडून सुरक्षित सामाजिक अंतर ठेवले जात नाही किंवा मास्कचा वापर केला जात नाही यामुळे रुग्ण वाढतच आहेत. -----शहरात दिवसभरात २१२ रूग्णांची वाढपुणे :  शहरात दिवसभरात २१२ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १२ हजार ६८६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. विविध रुग्णालयातील २८० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ४ हजार ४९६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २१२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १५९ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २८० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात सोमवारी ०८ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५१८ झाली आहे. दिवसभरात एकूण २५५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १९५ रुग्ण, ससूनमधील १३ तर  खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ४९६ झाली आहेएकूण बाधित रूग्ण : १६०३१ पुणे शहर : १२३५७ पिंपरी चिंचवड : १६३२ कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १३०५मृत्यु : ६०४ 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर