शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे विभागातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ३४७; एकूण २६५ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 20:28 IST

आत्तापर्यंत विभागातील २ हजार ४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५२५

पुणे: पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ३४७ झाली असून विभागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २६५ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत विभागातील २ हजार ४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ६०७ असून १८७ रुग्ण गंभीर आहेत तर उर्वरित रुग्ण निगराणीखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.विभागातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून पुणे जिल्ह्यात २४५, सोलापूर जिल्ह्यात १८, कोल्हापूर जिल्ह्यात ५३, सातारा जिल्ह्यात २८ व सांगली जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत.पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५२५ झाली आहे. तर जिल्ह्यातील २ हजार १८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात २ हजार ११४  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात १७८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निगराणीखाली आहेत.सातारा जिल्ह्यात एकूण १६६ कोरोना बाधित रुग्ण असून आत्तापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर साताऱ्यात ८७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात ४६१ कोरोना रुग्ण असून आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे तर सोलापुरात २६१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सांगली जिल्ह्यात ५९ कोरोना रुग्ण असून आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून २४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३६ झाली असून २ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर कोल्हापुरात १२१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.विभागात आत्तापर्यंत ६० हजार ९० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४९ हजार २५९ अहवाल प्राप्त झाला आहे तर १० हजार ८८२ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी ४३ हजार ८१२ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून ५ हजार ३४७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर