शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : समाधानकारक! पुण्यात सोमवारी एकही मृत्यू नाही; कोरोना बाधितांच्या संख्येत मात्र ८० ने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 23:24 IST

आज नव्याने १३ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले          

ठळक मुद्देपुणे शहरात प्रशासनाने संचारबंदी केली कडक केली पर्यायी रस्तेही आता बंद

पुणे : पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू सत्र रविवारपासून थांबले असून, सोमवारीही एकही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही़ दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्ण या आजारातून बाहेर पडू लागले असून, आज आणखी १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, आज आणखी ८० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ६६६ एवढी झाली आहे.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सातपर्यंत नव्याने आढळून आलेल्या ८० रूग्णांपैकी  नायडू हॉस्पिटलमध्ये ४६, ससून हॉस्पिटलमध्ये १९, रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये ५, बुधराणी हॉस्पिटलमध्ये १, जहाँगिर हॉस्पिटलमध्ये १, भारती हॉस्पिटलमध्ये ४, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये २ व केईएम हॉस्पिटलमध्ये २ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. लॉकडाऊननंतर ६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून, रविवारपर्यंत असलेली ५८६ कोरोनाबाधित रूग्ण संख्या आज ६६६ वर गेली आहे. यापैकी ५० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीला १४ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये ससूनमधील ९, भारती व सिम्बॉयसिस हॉस्पिटलमधील प्रत्येकी २ व दिनानाथ हॉस्पिटलमधील १ रूग्णाचा समावेश आहे.लॉकडाऊन व आता संपूर्ण पुणे शहर सील करून राबविण्यात येणाऱ्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची मोठी वाढ समोर येत आहे. ७३९ वैद्यकीय पथकांच्या मार्फत आत्तापर्यंत ३७ लाख ३७ हजार २१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी संशयित म्हणून गणले गेलेल्या १ हजार ५५३ जणांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस