शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

Corona Virus News : चिंताजनक! पुणे शहरात शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 19:46 IST

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या पोहचली २१ हजारच्या उंबरठ्यावर

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी कोरोना आपत्तीनंतर प्रथमच एका दिवसात ३ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात तब्बल ३ हजार १११ नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली असून, १४ हजार ४८४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१.४७ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाच पर्यंत शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ८८९ इतकी झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ५३८ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ९२१ रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. दिवसभरात २१ जणांचा  मृत्यू झाला असून, यातील ५ जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात आजपर्यंत १३ लाख १३ हजार ८७० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३२ हजार ४९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ६ हजार ५७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३३ इतकी झाली आहे.

==========================

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या