शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 9:52 AM

पुणे शहरात ३,२४० रुग्ण झाले बरे तर ३६ जणांचा मृत्यू 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असली तरी मागील आठवड्याभरातील रुग्णवाढ सोमवारी कमी झाली. सोमवारी दिवसभरात ४ हजार ७७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ३ हजार २४०  रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ९१९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४२ हजार ७४१ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९१९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३ हजार ९५२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४८८ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ३ हजार २४० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ८९२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ९४ हजार १२१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४२ हजार ७४१ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १८ हजार ७२० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ लाख ७६ हजार ३४७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

..........पिंपरीत २१५२ जण पॉझिटिव्ह, ५१४० निगेटिव्हपिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. काल पॉझिटिव्ह रुग्णांनी उच्चांक गाठला होता. आज एक हजारांनी रुग्ण कमी झाले आहेत. दिवसभरात २ हजार १५२ रुग्ण सापडले असून १ हजार ८१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५ हजार १७४ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  दाट लोकवस्तीत कोरोना वाढला आहे. पंचवीस हजार लसीकरणाची मोहीम प्रशासनाने जाहिर केली होती. ती फेल झाली असून केवळ पंधरा हजार लसीकरण करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात  कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल ३३०० आलेली रुग्णसंख्या हजारांनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ५ हजार ५१३ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार १४०  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५५  जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ८०४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज पाच हजार एक जणांना डिस्चार्ज दिला आहे............................. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तलनेत पाचशेंनी अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ४५० वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५३ हजार ०८० वर गेली आहे...................................चौदा जणांचा बळीकोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कमी झाली. शहरातील १४ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १६ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. त्यात तरुण आणि ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०७९ वर पोहोचली आहे.......................१५ हजार जणांना लसीकरणकोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, एका दिवसात पंचवीस हजार लसीकरणाची मोहीम फेल झाली असून केवळ पंधरा हजार लसीकरण करण्यात आले. शहरातील महापालिकेच्या ५९ आणि खासगी २१ अशा एकूण ८० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात १३ हजार ६६८  जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह १५ हजार ६३७  जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाऱ्या १५ हजार ३९१ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ९८ हजार ७८४ वर पोहोचली आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल