शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus news : पुण्यामध्ये डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 11:23 IST

पुणे महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा..

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे : पुण्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आलेल्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पालिकेने तयारी करावी. खाटांच्या उपलब्धतेविषयी सतर्क राहावे अशा प्रकारच्या सूचना या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला केल्या आहेत.  यासोबतच पालिकेने उभे केलेले 'इन्फ्रास्ट्रक्चर', रुग्णालयातील सुधारणा, खाटांचे नियोजन आणि कोरोना रुग्णांवर योग्यरित्या उपचार होण्यासंदर्भात राबविलेल्या उपाययोजनांविषयी या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.

 केंद्र शासनाच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका सक्षमपणे काम करीत असल्याचे निरीक्षण या शिष्टमंडळाने नोंदवले. यासंदर्भात शिष्टमंडळातील सदस्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पुण्यामध्ये समाधानकारक काम झाल्याचे सांगितले.  पुण्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी गेल्या चार दिवसात पुण्यातील विविध कोविड सेंटरमध्ये भेट दिली. शहरातील उपाययोजनांची माहिती घेऊन महापालिकेत बैठका घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ६ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला त्यांचा दौरा शुक्रवारी संपला. तपासण्या वाढविण्यापेक्षा आवश्यकतेनुसारच  तपासण्या करण्याचे निर्देश या पथकाने दिले. आयसीएमआरच्या तपासणी बाबतच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या ही सूचना दिल्या. 'को-मॉर्बिड अर्थात कोरोना व्यतिरिक्त अन्य व्याधी असलेल्या रुग्णांचे अधिकाधिक सर्वेक्षण करून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध होतील आणि त्यांच्या जीवितास असलेला धोका टळेल याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.

तपासण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. रुग्ण संख्येची टक्केवारी पाहता रुग्ण संख्या घटल्याचे दिसत आहे. पुण्यामध्ये दिवसाला दोन हजार रुग्ण आढळून येत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून दिवसाला सातशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. रुग्ण वाढीचा दर आणखी कमी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पुण्यातील जम्बो रुग्णालय आणि अन्य कोविड सेंटरमध्ये तसेच खाजगी रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारांची त्यांनी माहिती घेतली. रुग्णांना खाटा उपलब्ध होत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांसोबत तसेच रूग्णांसोबत संवाद साधल्यावर त्यांनी आरोग्य व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केल्याचे सांगितले. नागरिकांनीही सर्व प्रकारची काळजी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल