शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus news : दिलासादायक ! पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढ रविवारपासून १ हजाराच्या आतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 12:23 IST

साधारणत:दहा हजारामागे आढळले ९६९ कोरोनाबाधित

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून कोरोनाची तपासणीही दररोज चार ते पाच हजाराच्या संख्येने शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजार ४०२ ; अ‍ॅक्टिव्ह रूग्ण १४ हजार ७१आजपर्यंत १ लाख ३३ हजार ६००  जण कोरोनामुक्त

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची वाढ रविवारपासून एक हजाराच्या आतच होत असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मात्र वाढीच्या दुप्पटीने झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची तपासणीही दररोज चार ते पाच हजाराच्या संख्येने होत आहे. पण कोरोनाबाधितांची वाढ ही सातत्याने कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ५ हजार ४३८ तर मंगळवारी ४ हजार ३३४ नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात आली़ तपासणीचे हे प्रमाण व आज प्राप्त झालेले तपासणी अहवाल पाहता, साधारणत: दहा हजारामागे ९६९ कोरोनाबाधित आढळले असून, हे प्रमाण केवळ ९.७ टक्क्यांवर आले आहे़.     आजमितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९०८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहे़.  यापैकी ४९३ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर २ हजार ९०३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. दिवसभरात २९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत.    शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजार ४०२ झाली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ७१  इतकी असून ही टक्केवारी ९.२ इतकी आहे.  आजपर्यंत १ लाख ३३ हजार ६०० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर ३ हजार ७३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.         -----------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल