शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : कोरोना योद्धा डॉक्टरांनाच जेव्हा रुग्णवाहिका मिळविण्यासाठी करावा लागतो संघर्ष..  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 12:16 IST

महापालिकेकडे कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स नसल्याने गैरसोय

ठळक मुद्देखेड तालुक्यातील डॉ. कृष्णा आल्हाट हे पाच-सहा वर्षांपासून १०८ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत

नारायण बडगुजर पिंपरी : अतितातडीची सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. पिंपरीतील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तेथून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची कसरत झाली. कोरोनायोद्धा असलेल्या डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांनाच प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

खेड तालुक्यातील चांडोली येथील डॉ. कृष्णा आल्हाट (वय ५४) हे पाच-सहा वर्षांपासून १०८ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत आहेत. रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण करताना डॉक्टर म्हणून ते कर्तव्य बजावतात. कोरोनाचा संसर्ग झाल्याने डॉ. आल्हाट यांना १५ सप्टेंबरला नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. त्यासाठी डॉ. आल्हाट यांचे कुटुंबीय सोमवारी सकाळपासून कोविड सेंटर येथे प्रक्रिया पार पाडत होते. दुपारच्या सुमारास कार्डियाक रुग्णवाहिका आली. मात्र, डिस्चार्जच्या प्रक्रियेस विलंब झाल्याने चालक रुग्णवाहिका घेऊन निघून गेला. रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून कुटुंबीयांनी पुन्हा प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे विनवण्या केल्यानंतर पहिल्या रुग्णवाहिकेचा चालक रुग्णवाहिका घेऊन पुन्हा तेथे दाखल झाला. कार्डियाक असूनही या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर तसेच संबंधित डॉक्टर नव्हते. त्यामुळे रुग्ण घेऊन जाता येणार नाही, असे चालकाने सांगितले.

................................

डॉक्टर म्हणून माझे पती कृष्णा आल्हाट यांनी कोरोना काळातही सेवा दिली. मात्र, आता त्यांचीच परवड होत आहे. त्यांच्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही दिवसभर प्रयत्न केले. दोघेही डॉक्टर असूनही आमचे असे हाल होत आहेत. सर्वसामान्य रुग्ण व नातेवाइकांची किती फरपट होत असेल, हे यावरून दिसून येते. - डॉ. नीता आल्हाट, चांडोली, ता. खेड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवारhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर