Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारी ५२७  तर पिंपरीत २८१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 07:59 PM2021-02-19T19:59:57+5:302021-02-19T20:03:26+5:30

आजचा पॉझिटिव्हिटी रेट १२. ३८ टक्के

Corona Virus News : 527 new corona infestations in Pune and 281 in Pimpri on Friday | Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारी ५२७  तर पिंपरीत २८१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारी ५२७  तर पिंपरीत २८१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

Next
ठळक मुद्देपुणे शहरात आजपर्यंत १० लाख ८९ हजार ७९३ हजार जणांची कोरोना तपासणी आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८१६ जणांचा मृत्यू

पुणे : कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असले तरी, अद्यापही त्याचे गांभिर्य नागरिकांना आलेले नाही. याचाच परिणाम की काय शहरात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची वाढ होत असून, शुक्रवारी ५२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. 

शुक्रवारी दिवसभरात ४ हजार २५४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत आजचा पॉझिटिव्हिटी रेट १२. ३८ टक्के इतका आहे. कालच्या तुलनेत तो दोन टक्क्यांनी अधिक वाढला आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ३२५ वर गेली असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही १५९ इतकी झाली आहे. दरम्यान सक्रियरूग्ण संख्याही आता वाढू लागली असून, ही संख्या २ हजार ३९९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात २८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे शहरात आजपर्यंत १० लाख ८९ हजार ७९३ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९६ हजार ९१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार ७०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरीत २८१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ
पिंपरी : शहरात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी शहरात २८१ रुग्ण सापडले आहेत. पिंपरी येथील एका ७८ वर्षाय रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात एकुण २७०५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ८७९ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १८२६ रुग्ण गृहविलगिकरणात उपचार घेत आहेत.

गुरूवारी शहरात १८० रुग्ण सापडले होते. त्यानंतर शुक्रवारी रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यापासून रुग्ण संख्या वाढ हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांना दंड आकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.त्याचबरोबर रस्त्यांवर थुंकू नये, सार्वजनिक ठिकाणी विना कारण गर्दी करू नये अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.

शहरात मार्चपासून आतापर्यंत १०२६९८ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ९८,१६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत शहारच्या हद्दीतील १८२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या बाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या एकुण ७७१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona Virus News : 527 new corona infestations in Pune and 281 in Pimpri on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.