शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारी २९८ व पिंपरीत १२२ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 21:35 IST

पुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९०

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात २९८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ६१ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७९ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. यातील २३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८२७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५६४ झाली आहे.  दिवसभरात एकूण २७६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५  हजार ४१५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ६१ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६५८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७९ हजार २०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

.......  पिंपरीत १२२ जण कोरोना पॉझिटिव्ह   पिंपरी  : औद्योगिकनगरीत कोरानाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असून शहरातील सात आणि शहराबाहेरील तीन अशा दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात १२२ जण पॉझिटिव्ह आढळले असून ९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर २ हजार  ४८३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे. मात्र, कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ५१० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ०७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६७४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.  तर दाखल रुग्णांची संख्या ७१९ वर पोहोचली आहे.

कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ७०७ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  ९५ हजार ०७० वर पोहोचली आहे. दोन दिवसात कोरोनामुक्तांची संख्या कमी होत असताना दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर