शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी १३५ तर पिंपरीत १२० कोरोनाबाधितांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 20:15 IST

पुणे शहरात आजपर्यंत ९ लाख ३२ हजार १६२ जणांची कोरोना तपासणी

पुणे : शहरात सोमवारी १३५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २०२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ९०१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.६५ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५५५ इतकी आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ८३७ इतकी आहेत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून,  यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६५२ इतकी झाली आहे. 

शहरात आजपर्यंत ९ लाख ३२ हजार १६२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ७३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  यापैकी १ लाख ७२ हजार २४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

=========

 

दिलासादायक : आणखी एक रुग्ण ब्रिटनमधील कोरोनाने बाधित नाही

पिंपरी : ब्रिटनमध्ये नवीन कोरोनाने धुमाकुळ घातला असताना पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या सात प्रवाशांचे अहवाल पॉझिट्व्हि आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नवीन कोरोनाचे बाधित आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी एआयव्हीकडे घशातील द्रवांचे नमुने पाठविले होते. त्यापैकी दोन दिवसांपूर्वी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आता आणखी एक अशा एकूण दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

 

पिंपरी-चिंचवड शहरात ब्रिटनवरून आलेल्या २६९ जणांचे शोधकार्य सुरू केले आहे. त्यापैकी १८९ जणांची तपासणी केली होती. त्यापैकी ७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.  

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना ब्रिटनमधील नवीन कोरोनाचा बाधा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी वैद्यकीय विभागाने रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यानंतर सोमवारी आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरातील १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ११० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ०३५ वर गेली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३ हजार ६६७ पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १ हजार ७६२ वर पोहोचली आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या