पुणे: पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांत तर मुंबईला देखील मागे टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ' पुणे मिशन' हाती घेत गुरुवारी पुण्यात दाखल झाले आहे. आगामी काळात कोरोनासंबंधीच्या उपाययोजना यांवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहे. नुकतीच या बैठकीला सुरुवात झाली आहे.
निलम गो-हे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील एकत्र आयएमए च्या डाॅक्टरांना काम करायचे आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करावी. डाॅक्टर, नर्स वर हाल्ले होतात. या महामारीमध्ये मनोबल खच्चीकरण होणे चुकीचे आहे. त्वरीत पोलिसांची टास्क फोर्स स्थापन करा.
शरद रणपिसे : सर्वसामान्या पर्यंत जास्तीत जास्त चांगली सुविधा पुरवावा,कोरोनावर नियंत्रणासाठी कडक धोरण घ्या.
माधुरीताई मिसाळ : खाजगी हाॅस्पिटल बीला संदर्भात अद्यापही काही नियंत्रण नाही. किती ही बिल देतात. यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.आमदारांनी निधी दिला होता.. खर्च पडलेला नाही.. निधी खर्चासाठी सेंट्रली नियोजन केले पाहिजे.
संग्राम थोपटे : सिबोयसेस.. सुविधा पेड आहे .. महात्मा फुले अंतर्गत हे हाॅस्पिटल रजिस्टर केले तर ग्रामीण भागातील लोकांना फायदा होईल. ग्रामीण भागातील 52 नवीन रुग्णालयांनी महात्मा फुले योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्याला तातडीने मंजुरी द्यावी.
भिमराव तापकीर : खाजगी हाॅस्पिटलसाठी प्रशासनाने अधिकारी नियुक्त केले आहे. या अधिका-यांचे नंबर लोकप्रतिनिधींना द्या. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.. डाॅक्टर, नर्स नाही.. आठ-आठ दिवसांनी नर्स प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचते.. हे खूप गंभीर आहे.
सुनील टिंगरे : 55 हजार रुपयांना इंजेक्शन.. 8-7 लाखांचे बील येते.. एवढी बिल आली तर शहरातील झोपडपट्टी भागात चार-पाच महिने झाले कन्टेमेन्ट झोन आहे. येथील लहान मोठे व्यापारी आहेत.2000 पेशंट- बेड 1600 - 400 रुग्णांना बाहेर फिरावे लागते. मोठ्या सोसायट्या कल्ब हाऊस देण्याची तयारी दाखवली आहे. मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
राहुल कुल : ग्रामीण भागातील रुग्णांना अद्याप ही उपचार मिळणे कठीण होते.
अशोक पवार : वाघोलीसाठी स्वतंत्र विचार करावा . ग्रामीण भागातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही
अतुल बेनके : कोविड केअर सेंटर ला निधी द्यावा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावीत
दिलीप मोहिते : शहरातील अनेक एमएमआरडीएमधील कंपन्यांनी सीएसआर खर्च केला नाही. याबाबत आढावा घेऊन मोठा निधी खर्च होईल. आमदार फंडातून रुग्णवाहिका घेण्यास परवानगी द्यावी. ग्रामीण भागात त्वरीत चांगले उपचार होण्यासाठीच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची सोय उपलब्ध करून द्यावी. थायरोकेअर लॅब संदर्भात अनेक तक्रारी आहेत. याबाबत लक्ष घालावे.