शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 15:07 IST

पुणे विभागात १०६ जण आढळले, उर्वरितांचा तपास सुरु

ठळक मुद्देप्राप्त झालेल्या यादीतील ५१ व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची शक्यता

पुणे : दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात समाविष्ट झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२  जणांची यादी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७० , सातारा जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील १०६ जणांना ट्रेसिंग करुन त्यातील ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील.  स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.    डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३६ , सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ व कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. या माहितीची छाननी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त ७ व्यक्ती आहेत. १८२ पैकी १०६ जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७० , सातारा जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील १०६ जणांना ट्रेसिंग करुन त्यातील ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्राव नमुने घेतले जातील. त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.    प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील ५१ व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे  तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील ५१ जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील १८२ जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMuslimमुस्लीमState Governmentराज्य सरकार