शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Corona virus : ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंद करण्यास मनुष्यबळाची कमतरता; किमान दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 13:12 IST

संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची नोंद करावयाची झाल्यास किमान दोन हजार मनुष्यबळाची गरज आरोग्य विभागाला आहे.  

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅपवरील नोंदणीचेच मोठे दुखणे   प्रत्येक सेविकेस प्रती घरामागे दिले जाणार अतिरिक्त दोन रुपये मानधननोंदी थेट अ‍ॅपवर घेतल्यास प्रत्येक नोंदणीस साधारणत: १५ ते २० मिनिटे

निलेश राऊत- पुणे : शहरातील ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंद करण्यास पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्यापही सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये श्रीगणेशा झालेला नाही. त्यातच विविध कारणे देणारे शिक्षक या कामी नकोच म्हणून आरोग्य खात्यानेही त्यांनाही हात जोडले आहेत. त्यामुळे उपलब्ध नर्सेस, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतच हे काम करावे लागणार आहे.    दरम्यान या ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंदणीच्या कामाला मोबाईल अ‍ॅपचे (वयश्री अ‍ॅप) मोठे दुखणे निर्माण झाले आहे. कारण सर्वच अंगणवाडी व आशा वर्कर्स यांच्याकडे अ‍ॅनरॉईड मोबाईल नाही, मग हा अ‍ॅप डाऊनलोड करून ही नोंदणी करायची कशी असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यातच आता ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने ज्यांच्याकडे अ‍ॅनरॉईड मोबाईल आहेत, त्यांना ते मुलाकरिता घरी ठेवावे लागत असल्याचेही काही सेविकांनी सांगितले आहे.    कोरोनाचा (कोविड-१९) चा सर्वाधिक संसर्ग हा अन्य व्याधींनी (आजारांनी) ग्रस्त असलेल्या नागरिकानांच होत असल्याने, राज्य शासनाने 'हाय रिस्क' नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना केल्या आहेत. तत्पूर्वी आरोग्य विभागाकडे १६ मार्चपासून सुरू झालेल्या सर्व्हेक्षणात १ लाख २५ हजार ७८४ अन्य आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांची नोंद पालिकेकडे उपलब्ध होती.     या नोंदी अपडेट करणे व नव्याने नोंदणी करण्यासाठी पालिकेने ६ जूनपासून काम हाती घेतले. पण १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे कारण देत, या कामी रूजू असलेल्या सुमारे १ हजार ९०० शिक्षकांनी आम्हाला यातून मुक्त करा असा तगादा लावला. तर अनेक शिक्षक संघटनांनीही याबाबत पत्रव्यवहार केला. त्यामुळे आरोग्य विभागानेही त्यांना रामराम करून, पुढील सर्वेक्षणाची भिस्त एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या  अंगणवाडी सेविकांकडे वळविली आहे. या कार्यालयाकडून सद्यस्थितीला १५५ अंगणवाडी सेविका उपलब्ध झाल्या असून, पालिकेला ७०० हून अधिक मनुष्यबळ तेथून मिळेल अशी अपेक्षा आहेत.    सद्यस्थितीला ९० आशा वर्कर्स, १५५ अंगणवाडी सेविका व पालिकेच्या काही नर्सेस अशा तुटपुंज्या मनुष्यबळावर शहरातील ७३ कंटन्मेंट झोनमध्ये हे काम सुरू झाले असले तरी, संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची नोंद करावयाची झाल्यास किमान दोन हजार मनुष्यबळाची गरज आरोग्य विभागाला आहे. सद्या ज्या नोंदी घेतल्या जात आहेत, त्या पालिकेने दिलेल्या फॉर्मवर लिखित स्वरूपात होत असून, त्या एकत्र करून नंतर हा 'डेटा वयश्री' या अ‍ॅपवर घेण्याचे काम करण्यात येणार आहे.     ------------------‘हाय रिस्क’ नागरिकांच्या नोंदी करण्यासाठी नियुक्त केलेल्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना अतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, या सेविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेला ५० लाख विम्याचे कवच व अन्य सुविधाही दिल्या जाणार आहेत.रूबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा. ------------------- आरोग्य विभागाने आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून या नोंदी होणार आहेत. नवीन यंत्रणा असल्याने प्रारंभी अडचणी येत असल्या तरी, रोजच्या वापरातून त्या दूर होतील. या कामामुळे अंगणवाडी सेविकांनाही अतिरिक्त उपत्नाचे साधण लॉकडाऊनच्या काळात निर्माण होत असून, शहरातील सर्व ज्येष्ठ व अन्य आजार असलेल्या नागरिकांची नोंद लवकरच पालिकेच्या यंत्रणेकडे असेल. डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख. --------------- ढोल पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सध्या ८ हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराच्या व्यक्तींच्या नोंदी घेण्यात आल्या असून, ही एकत्रित माहिती मोबाईल अ‍ॅपवर घेण्याचे काम सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात सेविकांमार्फत या नोंदी थेट अ‍ॅपवर घेतल्यास प्रत्येक नोंदणीस साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे प्रत्येक सेविकेस प्रती घरामागे अतिरिक्त दोन रुपये मानधन दिले जाणार असले तरी, यातून या सेविकांना दिवसाला किती उत्पन्न मिळेल हाही एक मोठा प्रश्न आहे.-----------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस