शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यातील जम्बो हॉस्पिटल पंधरा दिवसात पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल : विक्रम कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 12:36 IST

शहरातील अन्य हॉस्पिटलमधील बेडही ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू

ठळक मुद्देजम्बो हॉस्पिटलमध्ये आणखी ४०० बेड नव्याने सुरू करण्यासाठी नव्याने वर्क ऑर्डर काढण्यात येणार बाणेर येथील कोविड हॉस्पिटलही सोमवारपासून पूर्ण क्षमतेने म्हणजे ३१४ बेडसह सुरू होणार

पुणे : जम्बो हॉस्पिटल ४०० बेडच्या क्षमतेने कार्यरत ठेवण्यासाठी पीएमआरडीएकडून सध्या वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. शुक्रवारी या हॉस्पिटलमध्ये आणखी ४०० बेड नव्याने सुरू करण्यासाठी नव्याने वर्क ऑर्डर काढण्यात येणार असून येत्या आठ दिवसांत ते उपलब्ध होतील. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.जम्बो हॉस्पिटलकरिता लागणाऱ्या मनुष्यबळाचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, त्यासाठी ससूनमधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. जम्बो हॉस्पिटलची क्षमता वाढवितानाच, बाणेर येथील कोविड हॉस्पिटलही सोमवारपासून पूर्ण क्षमतेने म्हणजे ३१४ बेडसह सुरू होणार आहे़ आजमितीला येथे १८० बेड असून, १२० रूग्ण येथे उपचार घेत आहेत. तसेच शहरातील अन्य हॉस्पिटलमधील बेडही ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.------------महापालिकेडून स्वत:ची लॅब उभारण्याचा प्रयत्न पुणे महापालिकेकडून स्वत:ची टेस्टिंग लॅब तयार करून टेस्टिंग मशीन खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. ही लॅब सुरू झाल्यावर जास्तीत जास्त स्वॅब टेस्टिंग करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल असा विश्वास विक्रम कुमार यांनी यावेळी व्यक्त केला. महापालिकेने स्वत:ची टेस्टिंग लॅब तयार करावी अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून होत आहे.आजमितीला दररोज पाच ते सहा हजार नागरिकांची स्वॅब सॅम्पल्स घेतले जात आहेत. पण तया तुलनेत लागलीच टेस्टिंगचे अहवाल येत नाहीत. सध्या शहरात तीन ठिकाणी टेस्ट तपासणी केल्या जात असल्या तरी त्याला मर्यादा आहेत. तसेच याठिकाणी अन्य जिल्ह्यातूनही स्वॅब टेस्टिंगसाठी येत असल्याने, महापालिकेची स्वत:ची लॅब असणे फायदेशीर ठरणार आहे़ त्यामुळे या विषयावर स्थायी समिती, महापौर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले.----------------गटनेत्यांच्या सूचनांवर कार्यवाही करूशहरी गरीब योजनेचा निधी हा शहरातील सर्व नागरिकांचा प्रत्येकी दोन लाखांचा ९ महिन्यांकरिता आरोग्य विमा काढण्यासाठी खर्च करावा, अशी सूचना पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे. ही सूचना प्रत्यक्षात अंमलात येऊ शकते का याची तपासणी करून त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या