शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीकरांचं टेन्शन वाढलं; एकाच दिवसांत सापडले ८० कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 13:12 IST

अडीच महिन्यात प्रथमच उच्चांकी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले.

बारामती: दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने नागरिकांनी चांगलेच धास्ती घेतली आहे. आज एका दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात ८९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. गेल्या अडीच महिन्यात कोरोना रुग्ण आकडेवारी नियंत्रणात होती.मात्र आता   १८ फेब्रुवारीपासुन रूग्ण वाढीस सुरवात झाली आहे. त्यानंतर आता कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.प्रशासनाने उपाययोजना आणि दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आज गेल्या २४ तासातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील ५६ आणि ग्रामीणतधील २६ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यात प्रथमच आज उच्चांकी  रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ७२१४वर पोहोचली आहे. तर ६६३८ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण १४७ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अधिकारी रस्त्यांवर उतरले आहेत .आज एकाच कुटुंबात ११ रुग्ण सापडले आहेत , तर एकाच इमारतीत ९ रुग्ण सापडले आहेत. पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येक चौकात कारवाई सुरू केली आहे  आता विनामास्क फिरणाऱ्या महाभागांकडुन ५०० रुपये दंड आकारण्यास सुरवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने मास्क शिवाय दुकानात प्रवेश करू नये, असे फलक शहरातील प्रत्येक दुकानावर लावले आहेत. मात्र, दुकानांमध्ये येणाऱ्या काही उदासिन नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही.दुकानदार देखील त्याकडे दुर्लक्षच करत आहेत .तो फलक नामधारी ठरल्याचे वास्तव आहे . आगामी काळात उदासीन कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याने नागरिकांवर प्रशासन निर्बंध लादणार का , याची नागरिकांना आता चिंता सतावत आहे .—————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे