शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत नवीन ३९० रुग्णांची वाढ; तर १९८ बरे झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:38 IST

पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०२

ठळक मुद्देग्रामीण भागात एका दिवसांत उच्चांकी २७ रुग्ण वाढलेजिल्ह्यात सरासरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६० ते ६० टक्के व ग्रामीण भागात ७५ टक्क्यांपर्यत

पुणे : पुणे जिल्ह्यात नेहमीप्रमाणे शुक्रवारी( दि.१२) रोजी एका दिवसांत तब्बल ३९०रुग्ण वाढले. परंतु रुग्ण वाढीपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून १९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान ग्रामीण भागात प्रथमच एका दिवसांत २७ उच्चांकी रूग्ण वाढ झाली. यामुळे आता पर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०२ झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. असे असले तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले असून, सध्या जिल्ह्यात सरासरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६० ते ६० टक्के व ग्रामीण भागात हेच प्रमाण ७५ टक्क्यांपर्यत वाढले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसांत ११ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत पुणे जिल्ह्यात ४७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण व कँटोन्मेंट भागात देखील झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल २७ नवीन रुग्णांची भर पडली. ही बाब आता जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. ....शुक्रवारी नव्याने ३०५ कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरातील स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्ण वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या नव्या रूग्णांमध्ये आता शहरातील कंटन्मेंट झोनबरोबरच झोन बाहेरील रूग्ण वाढही लक्षणीय असून, शुक्रवारी नव्याने ३०५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये २२२ रूग्ण गंभीर असून, ४९ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३९५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, यापैकी २२५ जण पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व आयसोलेशन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर ससूनमध्ये १५ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६५ रूग्ण दाखल आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या १४२ जणांपैकी १०३ जण हे विविध आयासोलेशन सेंटरमधील असून, खाजगी हॉस्पिटलमधील २६ जण तर ससून हॉस्पिटलमधील १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आजपर्यंत शहरात एकूण कोरोनाबाधितांपैकी ५ हजार ९२४ कोरोनामुक्त झाले असून, ही टक्केवारी ६५.४२ टक्के इतकी आहे.     पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज मृत्यू झालेल्या १२ जणांचा समावेश आहे. ------ 

एकूण बाधित रूग्ण : ११२०२पुणे शहर : ९१६६पिंपरी चिंचवड : १०७८कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ९५८मृत्यु : ४७१बरे झालेले रुग्ण : ७११०

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरNavalkishor Ramनवलकिशोर राम