शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ३६३ तर पिंपरीत १७१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 11:23 IST

पुणे शहरात २६८ तर पिंपरीत १३६ जण कोरोनामुक्त

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरूवारी दिवसभरात ३६३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ०४४  झाली आहे.    उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७३ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. यातील २२६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५५९ झाली आहे. पुण्याबाहेरील १ मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात एकूण २६८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ५१४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५  हजार ११७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ४४ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २७० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७५ हजार ५४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ....  औद्योगिकनगरीत दिवसभरात १७१ जण पॉझिटिव्ह

पिंपरी  : औद्योगिकनगरीत दिवसभरात १७१ जण पॉझिटिव्ह आढळले असून १३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर २ हजार ६४४ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  कोरोनाने दिवसभरात दोघांचा बळी घेतला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात  नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ६९९ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ३५९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात १९७१ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७१४ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ६०३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  ९४ हजार ९४८ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर