पुणे : शहरात शुक्रवारी १ हजार ८९१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, दिवसभरात १ हजार ९२६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १७ रूग्ण पुण्याबाहेरील होते. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४९३ व्हेंटिलेटरवर, ४६० आयसीयू मध्ये तर ३ हजार ५२३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते. शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख २८ हजार ४२३ झाली असून, आतापर्यंत १ लाख ८ हजार १२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ०७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार २९३ झाली आहे. आज दिवसभरात ६ हजार २८९ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ६२ हजार ९४६ इतकी झाली आहे. --------------------------------
Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ : २ हजार २१९ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 13:03 IST
शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू
Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ : २ हजार २१९ कोरोनामुक्त
ठळक मुद्देदिवसभरात ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू आतापर्यंत १ लाख ८ हजार १२३ जण कोरोनामुक्तशहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार २९३